*स्वास्थ्यसमग्र - भाग 2*
आज आपण स्वास्थ्यातील गुंतवणुकीबद्दल बोलणार आहोत आजकाल टीव्ही, फेसबुक, युट्युब चॅनेल मध्ये आर्थिक गुंतवणूक या संदर्भात बरेच माहिती देणारे व्हिडिओ आढळून येतात .आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण आर्थिक गुंतवणुकीबाबत सजग झालेला दिसून येतो खरंतर ही गोष्ट निश्चितच आवश्यक आहे परंतु *आरोग्यातील गुंतवणुकीच्या* बाबतीत मात्र तो उदासीन असतो. खरंतर या वाक्याबाबत बरेच जण कदाचित असा आक्षेप घेतील की आम्ही तर हेल्थ इन्शुरन्स काढला आहे . हेल्थ इन्शुरन्स सारखा गुंतवणीचा मार्ग हा एखाद्या रोग झाल्यानंतर त्यासंदर्भामधल्या आर्थिक नियोजनाचा आहे . मी ज्या गुंतवणुकी संदर्भात बोलतो आहे ती म्हणजे विकार होऊ च नये या संदर्भामध्ये आहे इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं की *Investing in yourself is the best investment you will ever make* खरंतर आयुर्वेद शास्त्र हे देखील आरोग्यातील गुंतवणुकीला प्राधान्य देणार आहे आणि म्हणूनच आयुर्वेदाचे प्रयोजन सांगताना *स्वस्थ स्य स्वास्थ्य रक्षणम् आतुरस्य विकार प्र शमनम् च* । असे सांगितले आहे यामध्ये स्वस्थ म्हणजे जो निरोगी व्यक्ती आहे अशी व्यक्ती कायम निरोगी राहावी, स्वस्थ राहावी या संदर्भामध्ये काय करावे याचे मार्गदर्शन आयुर्वेद शास्त्रामध्ये उपलब्ध आहे हीच खरी स्वास्थ्यामधील गुंतवणूक आहे . एखादा व्याधी शरीरामध्ये निर्माण झाला व उपचाराच्या आधारे बरा झाला तरी शरीराचे झालेले नुकसान हे भरून येत नाही त्यामुळे अशा स्वरूपाच्या विकाराला शरीर बळी पडू नये यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक ठरते यासाठी आयुर्वेदाने काही वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचा विचार केलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम उपक्रम म्हणजे *अभ्यंग* होय . अभ्यंग म्हणजे शरीरावर औषधी सिद्ध तैला द्वारा massage करणे . सध्या अभ्यंग हा उपक्रम दिवाळीला नरक चतुर्दशीच्या दिवशी पुरताच मर्यादित केला गेला आहे ही दुर्देवी वास्तविकता आहे .आजची तरुण पिढी टीव्हीवर दिसणाऱ्या जाहिरातींना भुलून सुगंधी लोशन अंगाला लावण्यात धन्यता मानत आहे . तेल लावल्यामुळे कपडे तेलकट होतात , अंगाचा वास येतो अशी अनेक कारणे ही सांगितली जातात . थोडक्यात अभ्यंग हा out dated उपक्रम आहे असे त्यांना वाटते . पण जर अभ्यंगाचे महत्व
आयुर्वेदीय दृष्टिकोनामधून समजून घेतलं तर निश्चितच अभ्यंगाकडे
बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलेल म्हणून हा लेखन प्रपंच . आयुर्वेदाने अभ्यंगाचे गुणधर्म विस्तृत स्वरुपात वर्णन केले आहेत
*अभ्यंगं आचरेत् नित्यं स जरा श्रम वात हा । दृष्टिः प्रसाद पुष्टयायुः स्वप्न सु त्वक्त्व दार्ढ्य कृत्*। अभ्यंग हा संपूर्ण शरीरावर करावयाचा असा उपक्रम आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात शरीराची झीज ही होतच असते आणि त्यामधून वाताचा प्रकोप होऊन अनेक वातविकारांचा पाया रचला जात असतो त्यामुळे नित्य अभ्यंगाने हा वातदोष नियंत्रणात आणण्यास मदत होत असते . आयुर्वेदानुसार साधारणत : सकाळी ज्यावेळेस भूक लागलेली असेल अशा वेळेस व्यायामापूर्वी अभ्यंग करावा . त् कारण ज्यावेळेस आपल्याला भूक लागलेली असते त्यावेळेस तैलाचे शोषण जे आहे ते शरीरामध्ये व्यवस्थित होत असते . अभ्यंग हा नित्य करावयाचा उपक्रम आहे त्यामुळे केस गळणे किंवा केस पांढरे होणे ही लक्षणे निर्माण होत नाहीत थोडक्यात वयःस्थापन ( तारुण्य टिकवून ठेवणे ) हे नित्य अभंगामुळे शक्य आहे . जे लोक शारीरिक श्रम करणारे आहेत किंवा स्पोर्ट्समन आहेत त्यांनी जर आपल्या दिनचर्येत अभ्यंगाचा समावेश केला तर कामामुळे किंवा खेळण्यामुळे ज्या injury होतात ज्या त जास्त त्रासदायक ठरत नाहीत व लवकर बऱ्या होतात . थोडक्यात स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये देखील प्रिव्हेंटिव्ह म्हणून अभ्यंगाचा वापर करावा असे मला आवर्जून नमूद करावे असे वाटते . आजच्या काळामध्ये विशेषता तरुणांमध्ये डोक्याला तेल न लावण्याची फॅशन वाढत चाललेली आहे . उलट वारंवार डोक्याला शाम्पू लावून केस जास्तीत जास्त कोरडे कसे राहतील यावर फॅशनच्या नावाखाली भर दिला जातो या सर्वांची परिणती म्हणजे लवकर केस पांढरे होणे , केसात कोंडा होणे , केस गळणे , शांत झोप न येणे, चिडचिड वाढणे, वारंवार डोके दुखणे इत्यादी मध्ये झालेली दिसून येते याचे मुख्य कारण केसाच्या मुळाशी असलेला जो स्नेह आहे तो कमी पडतो केसांचे पोषण थांबते व केस गळायला सुरुवात होते . केसाला केवळ औपचारिकता म्हणून तेल लावून उपयोगी नाही तर तेलाने डोके ओले झाले पाहिजे तरच केसांचे आरोग्य टिकवून राहिल . स्वास्थ टिकवण्यासाठी अभ्यंग हा उपयोगी आहेस फक्त काही अपवादत्मक परिस्थितीमध्ये तो टाळावा उदाहरणार्थ कफाचे विकार असतील , अजीर्ण झालेले असेल, अंगात ताप आलेला असेल अशावेळी निश्चितच अभ्यंग काही काळापर्यंत वर्ज्य करावा जसं शिरोऽभ्यंग स्वास्थ्यरक्षणासाठी महत्त्वाचा आहे तसेच *पादाभ्यंग* म्हणजे पायांना तेल लावणं हे देखील स्वास्थ्यरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे . ज्यांच्या तळपायांना भेगा पडतात , तळपाय वारंवार दुखतात तळपायांची जळजळ होते अशा व्यक्तींनी जर पायाला तेल लावून रात्री झोपताना मसाज केल्यास निश्चितच फायदा होऊ शकतो .
*कृण्वन्तो विश्वं स्वस्थं* हे आयुर्वेदाचे ध्येय आहे त्यामुळे जर स्वास्थ्यसंवर्धक अशा उपक्रमांचा समावेश आपण दैनंदिन जीवनक्रमामध्ये मध्ये केला तर निश्चितच भविष्यात होणारे विकार हे टाळता येतील असा मला विश्वास वाटतो . धन्यवाद🙏🙏
Comments
Post a Comment